महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत आध्यात्मिक अनुभूती आणि साधना मार्गातून मिळालेल्या प्रेरणेनुसार सिध्दपीठाची निर्मिती झालेली आहे. सिद्धपीठ हे संपूर्ण परिसराचे नाव आहे. निरंतर ध्यान साधना, नाद ब्रम्हचा उन्मेश आणि ईश सेवा या त्रिगुणा च्या संगमातून सिद्धपीठाची भुमी सिद्ध झालेली आहे. अपार शांततेची अनुभूती, सात्त्विक गुणांचा संचार व इश्वरी शक्तिचा साक्षात्कार सिद्धपीठात आल्यावर होतो. मात्र अत:र्मुख होण्याची आवश्यकता आहे. सिद्धपिठात आल्यावर प्रसन्नता, कलात्मकता आणि सात्विकता जाणवेल. सिद्धपीठाला आध्यात्मिक भूमिकेतून बघण्याची गरज आहे. प.पू.श्री महाअवतार बाबाजी यांच्या अस्तित्वाची प्रचिती सिद्धपिठात येईल. सिद्धपीठ ही तपोभूमी आहे, साधना पीठ आहे. भक्तिधाम आहे. सिद्धापिठात आल्यावर तमस शक्तीचा र्हास होऊन सात्विक ऊर्जेचा संचार झाल्याचे जाणवते. व भक्तांना वारंवार इथे येण्याची इच्छा होते. सिद्धपीठ येथे श्री आई महालक्ष्मीचे, बारा ज्योतिर्लिंगाचे आणि श्री बालाजी भगवंताचे भव्य व विलोभनीय मंदिर आहे.
सिद्धपिठात बौद्धिक दिव्यांग (मतिमंद) व्यक्तींचे सेवा पीठ आहे. सुंदर वृक्ष वल्ली सिद्धपीठाचे वैशिष्टय आहे. भक्त नकळत निसर्गाशी जवळीकता साधतात आणि रमून जातात. ध्यान केंद्रात ध्यान करण्याची व्यवस्था आहे. लहान मुलांना मुक्तपणे खेळण्याचा आनंद सिद्धपिठात घेता येतो.
शेगांव या पुण्यभूमीत आल्यावर सर्वांनी एकदा तरी सिद्धपिठात येऊन अनुभूती घ्यावी अशी आमची इच्छा आहे.