सेवा कार्य

मुख्य पृष्ठ >> ध्यान केंद्र

ध्यान केंद्र

Devi Jakhumai

मानवी जीवनातील दैवी कल आणि सात्विक गुण वाढविण्याची सहज प्रक्रिया ध्यान साधनेमध्ये घडते. स्वतःला शून्यत्वाकडे घेऊन जाणे व निर्विचार अवस्थेमध्ये आत्मा व परमात्म्याच्या दर्शनाचा योग ध्यानामध्ये घडतो.

सिद्धपीठात अतिशय सुंदर ध्यान मंदिर निर्माण करण्यात आले आहे. ध्यान मंदिराच्या आकारामुळे भक्तांना आरामदायी बसण्याची व्यवस्था आहे. समोरच श्री ज्ञानेश्वर माऊलीची ध्यानमग्न प्रतिकृती असून मंद प्रकाशयोजनेने सजवलेल्या भिंतीवर भक्तिमय दिंडीची दृश्ये कोरण्यात आली आहेत. ही दृश्ये ध्यानसाधना करणाऱ्या साधकांना ध्यान करण्याची प्रेरणा देतात.

ध्यान केंद्र आजच्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनात मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण स्थान ठरलेलं आहे . याच गोष्टीला लक्षात घेऊन, * आविष्कार संस्था शेगाव स्थित सिद्धपीठ परिसरात ध्यान केंद्राची स्थापना केली आहे. हे केंद्र शांत, सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण प्रदान करते, जे प्रत्येक भाविकाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास सहाय्यक ठरू शकते.

ध्यान केंद्राची कार्ये -
  1. ध्यान सत्रांचे आयोजन करणे.
  2. स्थानिक समुदायाशी जोडले जाणे आणि लोकांना ध्यानाबद्दल जागरूक करणे.
  3. निवास योजना (आवास योजना) आयोजित करणे.
  4. मंदबुद्धी मुलांना ध्यानाचे प्रशिक्षण देणे
ध्यान केंद्र साठी चौकशी करा