कोहिनूर इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज्ड पर्सनस नागपूर येथे 40 विद्यार्थींसाठी ही विशेष शाळा 2012 पासून चालविण्यात येत आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार शासनाच्या "दिशा अभियान" प्रमाणे विशेष शिक्षण दिले जाते. विशेष प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या कामानुसार विविध विषयांचे शिक्षण व प्रशिक्षण नियमितपणे देतात.
विशेष शिक्षण

आविष्कार संस्थेद्वारे बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन विशेष शाळा चालविण्यात येतात. त्या पैकी एक श्री गजानन महाराज निवासी मतीमंद विद्यालय शेगांव येथे व दुसरी कोहिनूर इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज्ड, नागपूर येथे चालविली जाते.
श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय
सर्व भौतिक सोयींनी सुसज्ज व प्रशस्त इमारत असलेल्या या विद्यालयात ३ ते १८ वर्षे वयोगटातील मतिमंद मुलांना प्रवेश दिला जातो. विद्यालयाची मान्य विद्यार्थी संख्या १०० असून विशेष प्रशिक्षित शिक्षकवृंदांकडून शासनाचे "दिशा अभियाना" अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांचे क्षमतेप्रमाणे दैनंदिन क्रिया, भाषा, गणित, सामान्य ज्ञान, संगीत, खेळ व योग इत्यादी विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. ०-६ वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता अर्ली इंटरवेंशन केंद्र (शीघ्र हस्तक्षेप केंद्र) कार्यान्वित आहे. सदर विद्यालयाचे वसतिगृह असून वसतिगृहात १०० विद्यार्थ्यांना मोफत पौष्टिक व पोषक आहार दिला जातो.
विशेष शिक्षण चौकशी करा