स्वावलंबन व्हिलेज शॉर्ट/लाँग स्टे होम

या प्रकल्पात १८ वर्षावरील मतिमंद मुलांना अल्प/दिर्घ कालावधी करिता व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. प्रवेशित मतिमंद विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्याकरिता उदबत्ती, धूपबत्ती, मेणबत्ती, फिनाईल, पंचगव्य गणेश मुर्ती, मातीची भांडी, खेळणी इत्यादी बनविण्याचं प्रशिक्षण, सोबतच दाल मिल, पिठाची गिरणी, वॉशिंग मशीन, द्रोण पत्रावळी इत्यादी मशीन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.
सदर प्रकल्पास शासनाचे कोणतेही अनुदान मिळत नसल्याने आपण मुलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांना आत्मनिर्भर होण्याकरिता व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्या करिता सहकार्य करावं.