शिवालय
चराचरात वास करणारी मातृशक्ती व समस्त विश्वाला आधार देणारी शिवशक्ती असा सुंदर मिलाप सिद्धपिठात बघायला मिळतो. आई महालक्ष्मीचे दर्शन झाल्यानंतर श्री ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते.या मध्ये देशातील प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती हुबेहूब तयार करून प्रतिष्ठित करण्यात आले आहेत.सोबतच ब्रह्मांड शिवलिंग,अर्धनारी नटेश्वर लिंग,रुद्राक्ष लिंग,स्फटिक लिंग, द्विनेत्र लिंग इत्यादी ७ अद्भुत शिवलिंगाचे दर्शन घडते. विशेषतः ग्रामीण भागातील भक्त जे ज्यांना केदारनाथ, सोमनाथ, मल्लिकार्जुन, या सारख्या लांब ठिकाणी जाणे शक्य नाही त्यांना लिंगाच्या प्रतिकृतीचे दर्शन घडविणे हा प्रमुख उद्देश ज्योतिर्लिंग पिठाचा आहे.
शिवालयात प्रवेश करताच आपण खूप पुरातन वास्तू मध्ये आल्याचे जाणवते.शिवालयातील ऊर्जा प्रत्येक भक्ताला उर्जित करते व ईश्वरी अस्तित्वाचा प्रत्यय येतो.
