सिद्धपीठ

  • समस्त विश्वाला संपन्नता प्रदान करणाऱ्या श्री आई महालक्ष्मीची कृपा भक्तांवर निरंतर असावी म्हणून सिद्धपीठांमध्ये महालक्ष्मी मंदिराचे निर्माण कार्य करण्यात आले आहे.
  • सिध्दपीठातील सेवा प्रकल्पाशी मंदिर सलग्न असल्याने प्रौढ मतिमंद मुले आध्यत्मिक कार्याकरिता लागणाऱ्या पूजा साहित्याची निर्मिती करित आहे.
  • श्री सिध्दमहालक्ष्मी चे आशीर्वादाने बहुसंख्य प्रौढ मतिमंद मुलांचे व्यावसायीक पुनर्वसन होईल.
  • श्री सिध्द महालक्ष्मीच्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा व कलश रोहण सोहळा परमपुज्य संत विभूतिंचे शुभहस्ते व विविध मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. दिनांक २७-०१-२०२३ रोजी परमपूज्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. या मंगल प्रसंगी कोल्हापूर येथून आणलेली देवीची ज्योत अखंडपणे मंदिरामध्ये सुरू आहे. मंदिरात दररोज काकड आरती, धूप आरती, महाआरती व शेजआरती करण्यात येते. मातेस दररोज मंत्राभिषेक केला जातो. मंदिरात येणाऱ्या भाविकांना तीर्थप्रसाद वितरित केले जाते. मातेस दररोज पुरणाचा नैवेद्य अर्पण केला जातो.
  • मंदिरात दररोज हजारो भक्त श्री महालक्ष्मीच्या दर्शनाचा लाभ घेतात. दर्शनाच्या वेळी भक्तांना अपार विश्वास आणि आत्मशांतीचा अनुभव येतो.