
ध्यान केंद्र

श्री गजानन महाराज

ज्योतिर्लिंग मंदिर

श्री सिध्द महालक्ष्मी

श्री सिध्द महालक्ष्मी मंदिर

श्री सिध्द महालक्ष्मी मंदिर

सिद्धपीठ
देवीचे दर्शन
दैनिक दर्शन

आमच्याबद्दल
|| श्री सिध्द महालक्ष्मी मंदिर ||
समस्त विश्वाला संपन्नता प्रदान करणाऱ्या श्री आई महालक्ष्मीची कृपा भक्तांवर निरंतर असावी म्हणून सिद्धपीठांमध्ये महालक्ष्मी मंदिराचे निर्माण कार्य करण्यात आले आहे.
सिध्दपीठातील सेवा प्रकल्पाशी मंदिर सलग्न असल्याने प्रौढ मतिमंद मुले आध्यत्मिक कार्याकरिता लागणाऱ्या पूजा साहित्याची निर्मिती करित आहे.
श्री सिध्दमहालक्ष्मी चे आशीर्वादाने बहुसंख्य प्रौढ मतिमंद मुलांचे व्यावसायीक पुनर्वसन होईल. श्री सिध्द महालक्ष्मीच्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा व कलश रोहण सोहळां परमपुज्य संत विभूतिंचे शुभहस्ते व विविध मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न होत आहे दिनांक २७-०१-२०२३ रोजी परमपूज्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. कोल्हापूर येथून आलेली ज्योत अखंडपणे मंदिरामध्ये सुरू आहे. मंदिरात दररोज काकड आरती, धूप आरती, महाआरती व शेजआरती करण्यात येते. मातेस दररोज मंत्राभिषेक केला जातो. मंदिरात येणाऱ्या भाविकांना तीर्थ वितरित केले जाते. मातेस दररोज नैवेद्य अर्पण केला जातो.
मंदिरात संपूर्ण वर्षभर दररोज ५ ते १० हजार भक्त माता श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतात. माता श्रींच्या दर्शनाच्या वेळी भक्तांना अपार विश्वास आणि आत्मशांतीचा अनुभव येतो.

Darshan & Donation
